*जाता जाता मला ऑक्सिजन देऊन गेले.*-They gave me oxygen on the way. *ऑक्सिजन.*

*काल एका बस स्टॉप वर बसची वाट पहात होतो. शेजारी एक आजोबा बसलेले होते. हातात एल्युम्युनियमची काठी, कानाला हेडफोन, खांद्यावर शबनम, तोंडात चॉकलेट असावे.*


*मी म्हणालो.....


*आजोबा कुठे जायचे ?*

*ते म्हणाले पास आहे ,जी बस येईल, त्या बस मध्ये बसायचे आणि फिरायचे.*

*मी म्हणालो - एकट्याने फिरताना भिती नाही वाटत?*

*त्या वेळेस ते म्हणाले मागील वर्षी बायको आजारी पडली, शेवटच्या क्षणी मी आणि माझा मुलगा डॉक्टर हजर होतो. बायकोने भितीने माझा हात धरून ठेवला होता तरी मी वाचऊ शकलो नाही. आमचं वय झाले म्हणुन बाहेर फिरायचो नाही.

ती गेल्यावर माञ मी हिंमत केली फिरायला सुरवात केली. मन खंबीर केले, आवडेल तिथे जातो, लोकांशी बोलतो, जे बघितले ते मुलाला घरी जाऊन सांगतो. सोबत आधार कार्ड, डॉक्टरांचा मोबाईल नंबर, मुलाचा मोबाईल नंबर, मेडिक्लेम पॉलिसी, औषधे आणि मोजके पैसे ठेवतो आणि फिरतो. जे आवडले ते खातो.

एखाद्या ठिकाणी मुक्काम करावासा वाटला तेथे थांबतो, मुक्कामाला असेल तर फोन करुन सांगतो. खुप एकटे वाटले की वृध्दाश्रमात जातो, छानपैकी खाण्याचे पार्सल घेतो त्यांच्या सोबत खातो. त्यांच्याशी संवाद करतो, भरपुर हसतो नवीन ऑक्सिजन मिळतो जगायला. काही वेळेस लहानपणीच्या आठवणी आल्या की अनाथाश्रमात जातो खाऊ घेतो, खेळणी घेतो भरपुर खेळतो. त्यामुळे घरचेही कंटाळत नाही आणि मी पण आनंदात रहातो.*

*एक बस आली, त्या मध्ये ते चढले. खिडकीतून त्यांनी बाय केले. मोबाईल नंबर घ्यायचा राहीला पण ............*

*जाता जाता मला ऑक्सिजन देऊन गेले.*


Write your Comments in the box.-आपल्या टिप्पण्या बॉक्समध्ये लिहा.👇


श्री स्वामी समर्थ!Oxygen. *

* I was waiting for a bus at a bus stop yesterday. A grandfather was sitting next door. Aluminum stick in hand, headphones in ears, Shabnam on shoulders, chocolate in mouth. *


* I said .....


* Where does grandpa go? *

* He said there is a pass, he would sit in the bus and walk around. *

* Don't feel scared walking alone? *

* At that time he said that last year his wife fell ill, at the last moment my son and I were attending the doctor. Although my wife held my hand in fear, I could not save her. We didn't want to go out because we were old.

When she left, I dared to start walking. He strengthens his mind, goes wherever he likes, talks to people, goes home and tells the child what he saw. Accompanied by Aadhar card, doctor's mobile number, child's mobile number, mediclaim policy, medicines and a small amount of money. Eats what he likes.

If he wants to stay somewhere, he stops there, if he wants to stay, he calls and tells him. Feeling very lonely, he goes to the old age home, takes a nice food parcel and eats with them. Communicates with them, laughs a lot, gets new oxygen to live. Sometimes I have childhood memories of going to an orphanage, eating, playing with toys. So I don't get bored at home, and I enjoy it too. *

* There was a bus, they got on it. He said bye through the window. I want to get a mobile number but ............ *

* Gave me oxygen on the go. *


Write your Comments in the box.-आपल्या टिप्पण्या बॉक्समध्ये लिहा.👇


श्री स्वामी समर्थ!
89 views0 comments