तेव्हा लक्ष आपल्यावर,आपल्या ध्येयावर केन्द्रित करावे, बरोबर ना.-So focus on yourself, your goal ✅
“आज सकाळी (Jogging) फिरायला गेलो होतो तेव्हा* *माझ्यापासून ५00 मिटर पुढे एक व्यक्ति गतीने चालत होती,  बहुदा रोज नियमाने चालत असणार.*

*निरखून पाहिल्यावर लक्षात आले की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी असे मला वाटले आणि थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन असे वाटले.*

*मग काय, मी माझा वेग वाढवला आणि लक्ष एकवटून चालू लागलो. मला अजून १ मैल चालायचे होते आणि घराकडे परत फिरायचे होते व तेवढ्या वेळात आपण त्याला नक्कीच पार करू याची खात्री मला होती...*

*थोड्याच वेळात लक्षात आले की दोघांमधील अंतर कमी झाले आहे, मी अजून वेगाने चालू लागलो. पावलागणिक अंतर कमी होत होते. माझा मलाच अभिमान वाटू लागला होता, माझी गती  पाहून....*

*आणि तो क्षण आला, मी त्याला पार केले, मागे टाकले..!*

*हुर्र्‍ये.. हुर्र्‍ये.. हुर्र्‍ये..*

*मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले, जिंकलीच आपण स्पर्धा....! स्पर्धा..? याबद्दल त्या व्यक्तिला तर काहीच माहीत नव्हते, तो या स्पर्धेचा भाग ही नव्हता.*

*मात्र जिंकण्याच्या ओढीने मी माझा रस्ता सोडून पुढे निघून गेलो होतो, जेथून वळायचे होते ते वळण मागे पडले होते. आता उशीर होणार होता, वेळापत्रक चुकणार होते, अचानक चिडचिड होवू लागली, अस्वस्थता आली. उलट जाण्यामध्ये बराच वेळ जाणार होता...*

*असेच होते ना आयुष्यात सुद्धा..? सगळे लक्ष कोण पुढे आहे, कोण पुढे जातो आहे, कोण पुढे जाईल ? याकडेच असते; सहकारी ? शेजारी..? मित्र? नातेवाईक?, यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, त्यांच्यापेक्षा आपण  पुढे आहोत हे स्वत:ला आणि इतरांना दाखवून देण्यातच आयुष्य जाते.*

*मग आपला मार्ग चुकतो किंवा बरेच काही करायचे राहून जाते.*

*या अनैसर्गिक तुलनेतील धोका म्हणजे “हे न संपणारे दुष्ट चक्र आहे.” ही नशा आहे, झिंग आहे हे ध्यानात येत नाही.*

*कोणीतरी पुढे असणारच आहे, हेच नैसर्गिक आहे हे ध्यानात येत नाही. विनाकारण असुरक्षिततेची भावना प्रबळ होते व सुख गमावून बसतो.*

*कोणाचे तरी मूल जास्त शिकलेले बनणार हे नक्की; कोणी तरी आपल्यापेक्षा जास्त सुंदर असणारच; कोणाला तरी एखादी संधी जास्त मिळणार; कोणाचे तरी वलय आपल्यापेक्षा मोठे असणारच; कोणाला तरी आपल्यापेक्षा कमी आजार असणारच; कोणाजवळ तरी काही तरी वेगळे असणारच...*


*********भिऊ नको मी आहे पाठीशी *********


English Translation:


"When I went for a jog this morning, * * a person was walking at a speed of 500 meters ahead of me, probably walking regularly every day. *


* On closer inspection, I realized that the person's speed should be a little slower than mine, and if I walked a little faster, I would definitely cross that person and move on. *


* So what, I increased my speed and started concentrating. I wanted to walk another 1 mile and get back home and I was sure we would cross it in that time ... *


* After a while I noticed that the distance between the two has narrowed, I started running faster. The step distance was decreasing. I was proud of myself, seeing my speed .... *


* And that moment came, I crossed it, pushed back ..! *

* Hurray .. Hurray .. Hurray .. *

* I felt appreciated in my heart, you won the competition ....! Competition ..? The man didn't know it, he wasn't part of the competition. *


* But with the urge to win, I left my path and went ahead, the turn from where I wanted to turn was behind. It was going to be late now, the schedule was going to be missed, there was a sudden irritability, there was discomfort. It would take a long time to reverse ... *


* Isn't it the same in life too ..? All attention is on who is ahead, who is going ahead, who will go ahead? This is it; Cooperative? Neighbors ..? Friend? Life is all about showing yourself and others that you are better than relatives, that you are ahead of them. *


* Then you get lost or you have to do a lot. *

* The danger in this unnatural comparison is "this is a never ending vicious cycle." It is intoxicating, it is unheard of. *


* Someone is going to be next, it is not natural to meditate. Feelings of insecurity can be overwhelming, and happiness can be lost. *


* Surely someone's child will become more educated; Someone must be more beautiful than you; Someone will get a chance more; Someone's curls must be bigger than yours; Someone must have less illness than you; Someone must have something different ... *


********* Don't be afraid, I am behind you *********


107 views0 comments