मी माझ्या नशीबा पेक्षा माझ्या सद्गुरून वर जास्त विश्वास ठेवतो कारण नशीब खुप वेळा बदलत असते.I trust

I trust my Sadguru more than my destiny because destiny changes so many times.


















माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवाव पैसा कमावला तर ठेवायला जागा लागते तसं पुण्याचं नाही ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येत

कारण...

कमवलेल्या पैशाच काम जिथे थांबत तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं .. !


वास्तू पुरुषास*


*साष्टांग नमस्कार विनंती विशेष,*


             झालं असं की, एकजण घरी आले होते ते बोलता बोलता म्हणाले *वास्तू प्रसन्न आहे हं तुमची*' आणि तुझी प्रथमच प्रकर्षाने आठवण झाली 

तुझी *शांत* करून जमिनीत पुरून जेवणावळी केल्या की तुला विसरूनच जातो रे आम्ही मग उरत ते फक्त  *घर*' तुझ्या खंबीर पाठिंब्याकडे अगदी पूर्ण कानाडोळा !!! 

अगदी अपराधी वाटलं मग काय तुझ्याशी *पत्र संवाद* करण्याचं ठरवलं म्हणून आज हे *पत्र* !

 तुझ्या विषयी विचार करताना कितीतरी गोष्टी प्रथमच लक्षात आल्या जिथे तू प्रसन्नपणे वावरतोस ते घरकुल खरंच सोडवत नाही

घरात बसून कंटाळा येतो म्हणून प्रवासाला म्हणजे पर्यटनाला गेलो तर 4 दिवस मजेत जातात पण नव्याची नवलाई संपते आणि घराची ओढ लागते

आजारपणात डॉक्टर म्हणतात आराम व्हावा म्हणून ऍडमिट करा पण तुझ्या कुशीत परतल्या शिवाय कोणाच्याही प्रकृतीला आराम पडत नाही हेच खरं

तुझ्या निवाऱ्यात अपरिमित सुख आहे अंगणातील छोटीशी *रांगोळी* स्वागत करते , दारावरच *तोरण* हसतमुखाने सामोरं येतं , तर *उंबरा* म्हणतो थांब *लिंबलोण* उतरू दे ---

 बैठकीत *विश्वास* मिळतो तर माजघरात *आपुलकी* ! स्वैपाकघरातील *प्रेम* तर दुधाच्या मायेनं ऊतू जात !

 तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील *भीती* पळवून लावते , खरंच *वास्तुदेवते* या सगळ्यामुळे तुझी ओढ लागते 

तुझी शिकवण तरी किती बहुअंगी,  *खिडकी* म्हणते *दूरवर बघायला शिक*, *दार* म्हणत येणाऱ्याच *खुल्या मनाने स्वागत* कर,  *भिंती* म्हणतात मलाही कान आहेत *परनिंदा* करू नकोस, *छत* म्हणत माझ्यासारखा *उंचीवर* येऊन विचार कर, *जमीन* म्हणते कितीही मोठा झालास तरी *पाय* माझ्यावरच असू देत तर बाहेरच  *कौलारू छप्पर* सांगत *स्नेहाच्या पंखा खाली* सगळ्यांना असं काही *शाकारून* घे की बाहेर शोभा दिसेल आणि  ऊन, वारा लागणार नाही !

इतकंच नाही तर तू घरातील, मुंग्या, झुरळ, पाली, कोळी  यांचाही *आश्रयदाता* आहेस त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्थाही बघतोस आणि निसर्गाच्या *अन्न साखळीला* हातभार लावतोस इतकं *मोठं मन* आमचंही व्हावं असा आशीर्वाद दे 

तुझ्या वाटणी साठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलाची घरं उभी रहातात याचं खरंच *वाईट* वाटतं

एकत्र कुटुंब पद्धतीकडून एकल कुटुंब पद्धतीकडे वेगाने निघालो आम्ही पण तरीही शेवटी *घर देता का कोणी घर*' ही *नटसम्राटाची* घरघर काही संपली नाही रे ! कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या  खाणाखुणा नाही *ते घर नसतं बांधकाम असतं रे विटा माती*

*वास्तू देवते* पूर्वी आई आजी सांगायची *शुभ बोलावं* नेहमी आपल्या बोलण्याला *वास्तूपुरूष* नेहमी *तथास्तु* म्हणत असतो

मग आज इतकंच म्हणते की 

"तुला *वस्तू* समजून विकायचा अट्टहास कमी होऊन तुझ्या *वास्तूत* वर्षातून काही क्षण तरी सगळी *भावंड मित्रमैत्रिणी आप्तेष्ट* एकत्र वास्तव्यास येऊ दे"

आणि या माझ्या मागण्याला तू *तथास्तु* असच म्हण हा माझा आग्रह आहे.


श्री स्वामी समर्थ !


52 views0 comments

SHREE. SWAMI SAMARTH Publishers

Real Homes, Madhuvan Township, Gokhivre Road 

Maharahtra, Mumbai, Vasai East

401208

Admin-E-mail

nayanambavkar@gmail.com

Be The First To Know

Sign up for our newsletter